Haryana Assembly Election Result : संजय राऊतांचा मोठा दावा, हरियाणात कोणाचं सरकार स्थापन होणार?
हरियाणा विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत हरियाणातील जवळपास सर्व 90 जागांचे अंदाज समोर आले आहेत. हे अंदाज समोर येत असताना संजय राऊत यांनी मोठा दावा करत निवडणूक आयोगावरच शंका व्यक्त केली आहे.
हरियाणाचे जे निकाल समोर येत आहे त्याचे राज्यातील राजकारणावर काही परिणाम होणार का असा सवाल संजय राऊत यांना केला असता, ते म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोग किंवा आयोगाची वेबसाईट म्हणजे भाजप आहे आणि ते काहीही करू शकतात, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर आरोप केल्याचे पाहायला मिळाले. तर अजून हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन्ही राज्यांचे निकाल पूर्ण समोर यायचे आहेत. निकाल वर काही खाली होत असतात अजून बऱ्याच राऊंडची मोजणी बाकी आहे पण हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार स्थापन होईल, यात शंका नाही असे म्हणत संजय राऊत यांनी हरियाणात काँग्रेसच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. पुढे संजय राऊत असेही म्हणाले, ‘मी जिंकण्याचा पूर्ण बंदोबस्त केला आहे. असे हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी सैनी काल सांगत होते. मी निवडणुका जिंकण्याचा पूर्ण बंदोबस्त केला आहे. हेच मुख्यमंत्री सकाळी आघाडीवर होते तेच आता पिछाडीवर आहे. त्याप्रमाणे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर काँग्रेस पिछाडीवर आहे पण हरियाणाची जनता स्वाभिमानी आहे, असे म्हणत हरियाणातल्या बदललेल्या कलांवर राऊतांनी भाष्य केले आहे.