Assembly Elections 2023 : … हा आमचा पायगुण, पाच पैकी चार राज्यात भाजप आघाडीवर; मुश्रीफ काय म्हणाले?

| Updated on: Dec 03, 2023 | 2:40 PM

तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा आज निकाल समोर येतोय. या निकालात काही ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाष्य केले आहे. भाजपच्य विजयावर हसन मुश्रीफ यांची मिश्किल टिप्पणी काय?

Follow us on

कोल्हापूर, ३ डिसेंबर २०२३ : देशातील चार राज्यांमध्ये सध्या विधानसभा निवडणूक होत असून तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा आज निकाल समोर येतोय. या निकालात काही ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाष्य केले आहे. कोल्हापुरातील दूधगंगा वेदगंगा सहकारी अर्थात बिद्री सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान होत आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बिद्री येथील मतदान केंद्रावर संस्था गटाचा प्रतिनिधी म्हणून मतदानाचा हक्क बजावला. यावेळेस त्यांनी सत्ताधारी महालक्ष्मी करी विकास आघाडी या पॅनलच्या विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला. दरम्यान विधानसभा निवडणुकीतील पाच पैकी चार राज्यात भाजप आघाडीवर आहे. गेल्या वेळेस या राज्यात भाजपला काहीच मिळालं नव्हतं. कदाचित आम्ही त्यांच्यासोबत गेल्याचा हा पायगुण असावा, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे.