पूरग्रस्तांना मदतीची घोषणा पंचनाम्यानंतरच, मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा करू : हसन मुश्रीफ

| Updated on: Jul 27, 2021 | 9:50 AM

पंचनामे झाल्यावरच मदत दिली जाणार, 2019 च्या महापुराच्या वेळी देवेंद्र फडणवीस आठ दिवसांनी आले होते, असा टोला मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला

देवेंद्र फडणवीस यांनी कुठे मदत केली होती. पंचनामे केल्यावर मदत केली जाईल, असं आश्वासन मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं. येणाऱ्या मंत्रिमंडळात मदतीची घोषणा होईल. तांत्रिक अडचण होणार नाही. एकरी मदत किती द्यायची यावर विचार होईल. केंद्र सरकारचे निकष ठरलेले आहेत. तळीयेला पोहोचायला रस्ता नव्हता. जास्त पाऊस पडल्यामुळे पाणी तुंबलं, पाणी ओसरायला वेळ लागत नाही. पाणी ओसल्याशिवाय पंचनामे होणार नाहीत, पंचनामे झाल्यावरच मदत दिली जाणार, 2019 च्या महापुराच्या वेळी देवेंद्र फडणवीस आठ दिवसांनी आले, असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला, केंद्र सरकारने त्यांच्या निकषाप्रमाणे मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Tv9Vishesh | लेखक, व्यावसायिक छायाचित्रकार ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री… उद्धव ठाकरेंचा प्रवास
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 27 July 2021