Rajesh Tope | कोल्हापूरमध्ये वेगाने लसीकरण व्हावं, हसन मुश्रीफांचा राजेश टोपेंकडे आग्रह
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Maharashtra Health Minister Rajesh Tope) कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर आहेत. आज ते जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Maharashtra Health Minister Rajesh Tope) कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर आहेत. आज ते जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत आहेत. ही बैठक सकाळीच सुरू झाली. आरोग्यमंत्री राजेश टोपे नेमक्या कोणकोणत्या सूचना अधिकाऱ्यांना देतात हे पाहावे लागेल. दरम्यान ही बैठक नियोजित नसल्याने अधिकाऱ्यांच्या आधीच आरोग्य मंत्री राजेश टोपे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. त्यामुळे नव्याने पदभार स्वीकारलेले जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Rahul Rekhawar), कोल्हापूर महानगरपालिका (Kolhapur Municipal corporation) आयुक्त कादंबरी बलकावडे आणि जिल्हा परिषद सीईओ संजय चव्हाण हे धावतच जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले.