Hassan Mushrif | चंद्रकांत पाटलांची ACBकडे तक्रार करणार – हसन मुश्रीफ
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मुश्रीफ यांनी सोमय्यांच्या या आरोपांवर पलटवार केला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मुश्रीफ यांनी सोमय्यांच्या या आरोपांवर पलटवार केला आहे. सोमय्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यावरूनच आपल्यावर आरोप केल्याचा दावा करतानाच रस्ते घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.
किरीट सोमय्या यांनी आज दुपारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आरोपांची राळ उठवली होती. त्यानंतर लगेचच मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांच्या आरोपांमधील हवा काढून टाकली. मात्र, यावेळी त्यांनी थेट चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करणार असल्याचंही जाहीर केलं. माझ्याकडे बेनामी संपत्ती असल्याचा शोध सोमय्या यांनी कुठून लावला? चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांनी काही तरी माहिती दिल्यानंतर सोमय्या यांनी हे आरोप केले आहेत, असा दावा त्यांनी केला.