प्रचंड व्हायरल! बंडखोर तानाजी सावंतांचं हे भाषण ऐकलंत का?

| Updated on: Jun 25, 2022 | 12:59 PM

तेव्हाचे कट्टर शिवसैनिक आणि आत्ताचे बंडखोर शिवसैनिक आमदार तानाजी सावंत यांचं एक भाषण व्हायरल होतंय.

सोलापूर: काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये झालेल्या आंदोलनात शिवसैनिक महिला पदाधिकारी अक्षरशः रडताना दिसून आल्या होत्या. गेल्या काही दिवसात राजकारणात भूकंपावर भूकंप चालू आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर राज्यातले शिवसैनिक चांगलेच तापलेत. ठिकठिकाणी आंदोलनं, मोर्चे काढले जातायत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर तानाजी सावंत हेदेखील त्यांच्यासोबत बंड करून आसामला गेले.आता राज्यभरातील शिवसैनिक (Shivsainik) आक्रमक झाले आहेत. त्यांनी बालाजीनगर परिसरातील तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलीये. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत 50 आमदार असल्याचा दावासुद्धा केलाय. या सगळ्या गदारोळात बऱ्याच गोष्टी व्हायरल (Viral) केल्या जातायत. तेव्हाचे कट्टर शिवसैनिक आणि आत्ताचे बंडखोर शिवसैनिक आमदार तानाजी सावंत यांचं एक भाषण व्हायरल होतंय. सोलापुरातलं हे भाषण आहे. बघुयात काय आहे ते भाषण…

 

Published on: Jun 25, 2022 12:59 PM
शिवसैनिक पेटले! बंडखोर नेत्याच्या कार्यालयाची तोडफोड
एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ मुंबईत बॅनर!