Headline | 11 AM | अनिल देशमुखांच्या घराला CRPFचा गराडा
ईडीने आज सकाळी (शुक्रवारी) पावणे आठच्या सुमारास देशमुखांच्या नागपुरातील घरी छापेमारी केली. यावेळी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सीआरपीएफचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात होते. पाच अधिकाऱ्यांमार्फत हे धाडसत्र सुरु झाले.
अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या गुन्हाच्या अनुषंगाने ईसीआयर (Enforcement Case Information Report म्हणजेच ECIR) दाखल करत ईडीने तपास सुरु केला होता. ईडीने आज सकाळी (शुक्रवारी) पावणे आठच्या सुमारास देशमुखांच्या नागपुरातील घरी छापेमारी केली. यावेळी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सीआरपीएफचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात होते. पाच अधिकाऱ्यांमार्फत हे धाडसत्र सुरु झाले. यावेळी अनिल देशमुख घरी नव्हते, तर त्यांची पत्नी आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. आधी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर महिनाभरातच ईडीनेही देशमुखांच्या नागपुरातील घरावर धाड टाकली आहे.