Headlines | हेडलाईन्स | 10 PM | 20 February 2022
आज मात्र मुख्यमंत्री एकदम ठणठणीत असल्याचं पाहायला मिळालं. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासोबतच्या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यावेळी पत्रकारांनी त्यांनी तब्येती विषयी विचारलं. तेव्हा मी जसा आहे तसा तुमच्यासमोर आहे. आता मी बरा आहे. लवकरच मी तुमच्याशी निवांत बोलेन, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मधल्या काळात पाठीच्या मणक्याशी संबंधित मोठी शस्त्रक्रिया पार पडली. तेव्हापासून मुख्यमंत्री महत्वाच्या बैठका किंवा कार्यक्रमांना दिसून आले नाहीत. त्यानंतर 26 जानेवारी रोजी मुख्यमंत्री सर्वांसमोर आले. त्यावेळीही त्यांची प्रकृती काहीशी बरी नसल्याचं जाणवत होतं. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावरील अंत्यसंस्कारालाही मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली होती. मात्र, त्यांचं पार्थिव ठेवलेल्या चबुतऱ्यावर ते गेले नाहीत. दरम्यान, आज मात्र मुख्यमंत्री एकदम ठणठणीत असल्याचं पाहायला मिळालं. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासोबतच्या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यावेळी पत्रकारांनी त्यांनी तब्येती विषयी विचारलं. तेव्हा मी जसा आहे तसा तुमच्यासमोर आहे. आता मी बरा आहे. लवकरच मी तुमच्याशी निवांत बोलेन, असं मुख्यमंत्री म्हणाले.