Rajesh Tope On Private Hospital Bill | आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं स्पष्टीकरण
कोरोना बाबत केंद्र सरकारचे अलर्ट पत्र आले आहे. मात्र घाबरण्यासारखी स्थिती राज्यात नाही आणि तातडीने काही करण्याची सुद्धा गरज नाही असं टोपे म्हणाले.
औरंगाबाद : माझं वैयक्तिक कुठलंही मेडिकल बिल नाही. माझी आई आजारी होती आणि तिचं ते बिल आहे, असा खुलासा टोपे यांनी केला. राहिला इतरांचा प्रश्न तर हा ज्याचा त्याचा प्रश्न आणि त्यांचा अधिकार आहे. ही सुविधा आहे आणि त्यांनी ती सुविधा घेतली. आमचे मेडिकल इन्शुरन्स सुद्धा आहे. त्यातून हे पैसे जात असतील. यातून सरकारी दवाखान्यावर विश्वास नाही असा काही प्रश्न नसल्याचं टोपे म्हणाले. कोरोना बाबत केंद्र सरकारचे अलर्ट पत्र आले आहे. मात्र घाबरण्यासारखी स्थिती राज्यात नाही आणि तातडीने काही करण्याची सुद्धा गरज नाही असं टोपे म्हणाले.