‘मी चिमटा काढत नाही, त्याला घोडा लावतो’, तानाजी सावंत यांचा रोख नेमका कुणावर?

| Updated on: Aug 11, 2024 | 3:42 PM

जे तुमच्याकडं हाय ते माझ्याकडे भी हाय... जे तुम्हाला येत त्याच्या दहा पट मला येतं हे अख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्याच्यामुळे ज्याला कुणाला खुमखुमी असेल त्याने नाद करायचा नाही, असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला. परंडा शहरातील बुथ प्रमुख व कार्यकर्ता मेळाव्यात आरोग्यमंत्री तानाजी सावंत बोलत होते

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वात परंडा शहरातील बुथ प्रमुख कार्यकर्ता मेळावा झाला. त्यात तानाजी सावंतांनी विरोधकांना सज्जड दम भरला तर विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची हमी दिली. सर्व राज्याला माहिती आहे की मी काय करु शकतो, याची आठवण त्यांनी यावेळी विरोधकांना करून दिली. चिमटा घेतला की, मी चिमटा काढत नाही त्याला घोडा लावतो हे ध्यानात ठेवा, असं राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले. सत्तांतर केलं आपले लाडके मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी 16 हजार कोटीचा निधी आपल्यासाठी मंजूर केला. जर आपण 2019 ला मंत्री असतो तर त्याचवेळी उजनीच्या पाण्याने आपल्या सर्व भूम धाराशिव जिल्हयातील धान्य जगली असती पण दुर्दैव असे झाले नाही. पण हे 2022 ला करून दाखवलं, कारण आपल्याला कोणी चिमटा घेतला त्याला आपण चिमटा घेत नाही. कारण भाई तुमच्या सारखीच माझी सवय आहे ,आर म्हटलं की कारं म्हणायच, असं तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमात म्हटलं आहे. तर चिमटा घेतला की मी चिमटा काढत नाही त्याला घोडा लावतो हे ध्यानात ठेवायचं, असं म्हणत राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी एकप्रकारे इशाराच दिल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Aug 11, 2024 03:42 PM
दाढी वरून केलेल्या राणेंच्या टीकेला जरांगे पाटलांचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले…
आमदार निवासस्थानी विक्रम सावंत यांच्या रुमचा स्लॅब कोसळला, बघा काय झाली अवस्था?