सुप्रिया सुळे म्हणतात ती अदृश्य शक्ती कोण?; आरोग्य मंत्र्याने घेतलं ‘या’ बड्या नेत्याचं नाव
सध्या राज्याच्या राजकारणातील विरोधी नेते मंडळी अदृश्य शक्ती म्हणत सत्ताधाऱ्यावर जोरदार निशाणा साधतांना दिसताय अशातच राज्यात कुणी अदृश्य शक्ती असेल तर....सुप्रिया सुळे म्हणतात ती अदृश्य शक्ती कोण?; आरोग्य मंत्र्याने घेतलं 'या' बड्या नेत्याचं नाव
धाराशिव, ८ फेब्रुवारी २०२४ : सध्या राज्याच्या राजकारणातील विरोधी नेते मंडळी अदृश्य शक्ती म्हणत सत्ताधाऱ्यावर जोरदार निशाणा साधतांना दिसताय अशातच राज्यात कुणी अदृश्य शक्ती असेल तर ते एकनाथ शिंदे आहेत, असे मंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी एक किस्सा देखील शेअर केला. ते म्हणाले, माझ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मंत्र्याला दम दिला होता. अदृश्य शक्ती कुणी असेल तर ते माझे मुख्यमंत्री, पक्षनेते एकनाथभाऊ शिंदे आहेत, धाराशिवमध्ये बोलत असताना एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं. ज्यावेळी मी मंत्री नव्हतो आमदार होतो तेव्हा मी सुप्रीम कोर्ट, डीआरटी, हायकोर्ट असेल त्या ठिकाणी मी डोकं आपटत होतो. त्यावेळी मी माझ्या सगळ्या शेतकऱ्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालत होतो. असे म्हणत मंत्री तानाजी सावंत यांनी एक किस्सा भर भाषणात सांगितला.