संजय राऊत माफी मागणार? ‘त्या’ वक्तव्यावरून आरोग्य मंत्र्यानं काय दिला थेट इशारा?

| Updated on: Dec 07, 2023 | 6:10 PM

राज्यातील आरोग्य विभागातील पदांचा लिलाव केला जात आहे. या विभागातील लिलाव करून बदल्या आणि बढत्या केल्या जात आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी प्रत्युत्तर देत संजय राऊत यांना थेट इशारा दिला आहे.

मुंबई, ७ डिसेंबर २०२३ : राज्यातील आरोग्य विभागातील पदांचा लिलाव केला जात आहे. या विभागातील लिलाव करून बदल्या आणि बढत्या केल्या जात आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. तर आरोग्य विभागातील एखाद्या पदाचा लिलाव होत असल्याचा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना यासंबंधित एक पत्रही लिहिले होते. त्याचे उत्तर किंवा त्यावर कारवाई झाली नाहीतर मोठा स्फोट करावा लागेल असा इशाराच संजय राऊत यांनी दिला. तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी संजय राऊत यांच्याकडून माफी मागवी अशी मागणी केली आहे. जर संजय राऊत यांनी माफी मागितली नाहीतर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असा थेट इशाराच दिला आहे.

Published on: Dec 07, 2023 06:10 PM
सुषमाताई…. मातोश्रीतील सरडेही आत्महत्या करतील, चित्रा वाघ यांचं झोंबणारं विधान काय?
ऐन थंडीत सरकारला घामटा फुटणार?, वडेट्टीवार यांच्या घरी विरोधकांची खलबतं; नेमकं काय शिजतंय?