Special Report | हाफकिनचं अज्ञान? आरोग्यमंत्री पुन्हा व्हायरल
ससून रुग्णालयात रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आरोग्यमंत्र्यांच्या कानावर आली होती. त्या तक्रारीचा सोक्षमोक्ष करण्यासाठी खुद्द तानाजी सावंतच ससून रुग्णालयात पोहोचले. तिथं पोहोचल्यानंतर ससून रुग्णालयात हाफकिनकडून औषधांचा साठा कमी होत असल्याची तक्रार डॉक्टरांनी आरोग्यमंत्र्यांना ऐकवली. त्यावर आरोग्यमंत्र्यांनी तातडीनं त्या हाफकिन नावाच्या माणसाकडून औषधं घेणं बंद करण्याचे तोंडी आदेश दिले. या आदेशानं डॉक्टरही कोड्यात पडले.
मुंबई : आरोग्यमंत्री तानाजी सावंताचा(Health Minister Tanaji Sawant ) आधी घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घरचा दौरा व्हायरल झाला आणि आता डॉक्टरांची झाडाझडती घेताना आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टरांनाच दिलेल्या एका चमत्कारिक आदेशाची बातमी व्हायरल होतेय. ही आहे ती बामती. ज्या बातमीचं कात्रण सोशल मीडियात दिवसभर फिरलं. व्हायरल बातमीनुसार ”हाफकिन नावाच्या माणसाला बॅन करा” म्हणजे हाफकिन नावाच्या व्यक्तीवर बंदी घाला, असे आदेश आरोग्यमंत्री तानाजी सावंतांना दिले आणि त्यावरुन डॉक्टरांना सुद्दा हसू आलं. हाफकिन शब्दावरुन आरोग्यमंत्र्यांचा काहीतरी गोंधळ झालाय. हे पीएच्या लक्षात येताच., तानाजी सावंतांच्या पीएनं आरोग्यमंत्र्यांचा संभ्रम दूर केला आणि त्यानंतर थोडक्यात हाफकिनवरची बंदी वाचली.
ससून रुग्णालयात रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आरोग्यमंत्र्यांच्या कानावर आली होती. त्या तक्रारीचा सोक्षमोक्ष करण्यासाठी खुद्द तानाजी सावंतच ससून रुग्णालयात पोहोचले. तिथं पोहोचल्यानंतर ससून रुग्णालयात हाफकिनकडून औषधांचा साठा कमी होत असल्याची तक्रार डॉक्टरांनी आरोग्यमंत्र्यांना ऐकवली. त्यावर आरोग्यमंत्र्यांनी तातडीनं त्या हाफकिन नावाच्या माणसाकडून औषधं घेणं बंद करण्याचे तोंडी आदेश दिले. या आदेशानं डॉक्टरही कोड्यात पडले. मात्र लगेच सावतांच्या पीएनं हाफकिन हा कुणी माणूस नसून, एक संस्था असल्याचं आरोग्यमंत्र्यांना सांगितलं असा दावा व्हायरल बातमीतून केला गेलाय.
व्हायरल बातमीनुसार महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनाच हाफकिन यांच्याबद्दल माहिती नसणं हे धक्कादायक असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त
होतायत. मात्र ज्यांना हाफिकन माहिती नाही. त्यांच्यासाठी थोडक्यात हाफकिन काय माणूस होता ते समजून घेऊयात.
हाफकिन यांचं पूर्ण नाव व्लादेमार मोर्डेकई हाफकिन होतं. ते मूळ युक्रेनमधले. योगायोगानं भारतात आले., आणि आयुष्याची 22 वर्ष त्यांनी भारतातच घालवली कॉलरा आणि प्लेग या दोन महारोगांवर त्यांनी लसी शोधल्या. प्लेगची लस यशस्वी ठऱली की नाही, यासाठी तर चक्क त्यांनी आधी स्वतःवरच लसीची चाचणी केली. 22 वर्षांच्या काळात हाफकिन यांच्या संशोधनामुळेच लाखो भारतीय डॉक्टर, सामान्य नागरिक आणि सैनिकांचे प्राण वाचले. पुणे त्यांच्या कामाचा गौरव म्हणून हाफिक संशोधन संस्था आणि औषध निर्माण मंडळ स्थापन झालं. सध्या हीच हाफकिन संस्था अनेक महत्वाच्या लसींचं संशोधन आणि औषधांचा पुरवठा करते. थोडक्यात ज्यांना हाफकिन हा माणूस माहित नसला, तरी आरोग्यक्षेत्रात हाफकिन नावानं एक संस्था कार्यरत आहे, हे तरी माहितच असतं.
दरम्यान व्हायरल बातमीनंतर विरोधक तानाजी सावंतांना टार्गेट करु लागले आहेत. तर मी स्वतः डॉक्टर आहे. त्यामुळे मला हाफकीन बद्दल कसं माहिती नसेल, असा प्रश्न करत सोशल मीडियात फिरणारी बातमी पूर्णपणे चुकीचं असल्याचा दावा आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी केलाय.