एसटी कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात? पालघर आगारातील स्वच्छता अन् विश्रामगृहाची बकाल अवस्था

| Updated on: Feb 02, 2024 | 12:38 PM

पालघर आगारातील एसटी कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पालघर आगारात एसटी कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी असणाऱ्या विश्रामगृहाची अवस्था अत्यंत बकाल असल्याचे समोर आले आहे. तर यासोबतच स्वच्छतागृहांमध्ये देखील अस्वच्छ वातावरण असल्याचे दिसतंय.

पालघर, २ फेब्रुवारी २०२४ : राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीचे कर्मचारी हे अहोरात्र मेहनत करत असतात. अशातच त्यांच्या ड्युटीच्या वेळा या कधीच मर्यादित नसतात. ज्या आगारात आपली बस हे कर्मचारी घेऊन जातात त्या ठिकाणी ते राहत असतात. मात्र अशापरिस्थितीतही त्यांना राहण्याची झोपण्याची बकाल अवस्था असेल तर त्यांनी जगावं तरी कसं? असा गंभीर प्रश्न आता निर्माण होत आहे. पालघर आगारातील एसटी कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पालघर आगारात एसटी कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी असणाऱ्या विश्रामगृहाची अवस्था अत्यंत बकाल असल्याचे समोर आले आहे. तर यासोबतच स्वच्छतागृहांमध्ये देखील अस्वच्छ वातावरण असल्याचे दिसतंय. यावरून पालघर आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासंबंधित प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पालघर आगारातील स्वच्छतागृहे आणि विश्रामगृहे अस्वच्छ आहेत मात्र तरीही विभागीय नियंत्रक आणि आगार व्यवस्थापकांचं दुर्लक्ष केले आहे.

Published on: Feb 02, 2024 12:37 PM
राज्यातलं अख्खं ‘मार्केट’ आता सरकारचं होणार? बड्या बाजार समित्यांसाठी कोणता होणार मोठा निर्णय?
पूनम पांडे हिचं वयाच्या 32 व्या वर्षी Cervical Cancer नं निधन