Special Report | हायकोर्टात पुन्हा उद्या सुनावणी, बेल, की आर्थर रोड जेल ?
आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद पूर्ण झाला असला तरी अद्याप एनसीबीच्या वकीलांचा युक्तीवाद बाकी आहे. मात्र, न्यायालयाची वेळ संपल्यानं या प्रकरणावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यन खानला आजची रात्रही कारागृहातच काढावी लागण्याची शक्यता आहे.
मुंबई : मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना आजची रात्री आर्थर रोड कारागृहातच काढावी लागणार आहे. कारण, या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीत आज आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी अरबाज मर्चंटचे वकील अमित देसाई आणि मुनमुनचे वकील अली कशिफ यांनी युक्तीवाद केला. आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद पूर्ण झाला असला तरी अद्याप एनसीबीच्या वकीलांचा युक्तीवाद बाकी आहे. मात्र, न्यायालयाची वेळ संपल्यानं या प्रकरणावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यन खानला आजची रात्रही कारागृहातच काढावी लागण्याची शक्यता आहे.