Shivsena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?
शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर नियमित सुनावणी सुरू आहे. दरम्यान, आज होत असलेली शिवसेना आमदार अपात्रतेबाबतची आजची सुनावणी संपली असून उद्या सकाळी ११ वाजता पुन्हा याप्रकरणावर सुनावणी होणार
मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३ : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर नियमित सुनावणी सुरू आहे. दरम्यान, आज होत असलेली शिवसेना आमदार अपात्रतेबाबतची आजची सुनावणी संपली असून उद्या सकाळी ११ वाजता पुन्हा याप्रकरणावर सुनावणी होणार आहे. तर सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांसमोर विधान भवनाच्या सभागृहात या प्रकरणी सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीवेळी दोन्ही गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाची उलट तपासणी उद्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार असून शिंदे गटाची उलट तपासणी त्यानंतर होणार आहे. 1, 2,7,8 डिसेंबर या तारखेदरम्यान शिंदे गटाची उलट तपासणी होणार आहे. तर 11 ते 20 डिसेंबर दरम्यान अंतिम सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी 21, 22 डिसेंबर हे अधिकचे दोन दिवस देणार येण्यात असल्याचेही सांगितले जात आहे.