महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा फैसला अद्याप बाकी, आता ‘या’ तारखेला होणार पुढची सुनावणी

| Updated on: Mar 02, 2023 | 4:45 PM

VIDEO | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या युक्तिवादात एकनाथ शिंदे यांचे वकील हरिष साळवे यांची एन्ट्री, आणखी किती दिवस युक्तिवाद?

संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी आज संपणार अशी स्थिती होती. मात्र, आजही महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर कोणताही फैसला झाला नाही. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी आज ही सुनावणी संपणार अशी शक्यताही वर्तवली होती. अशातच आज एकनाथ शिंदे यांचे वकील हरिष साळवे यांची एन्ट्री आजच्या सुनावणीत झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी युक्तिवाद करताना उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा उपस्थित केला. यामुळे आता ही सुनावणी आणखी दोन दिवस होणार आहे. 14 मार्चला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पार पडणार आहे. दोन दिवस ही सुनावणी चालणार असून दोन्ही बाजूचे वकील यावेळी युक्तिवाद करणार आहे. सर्वोच्च न्यायायलातील सुनावणी पार पडल्यानंतर पुढील तारीख देण्यात आली आहे. 14 मार्चला ही सुनावणी पार पडणार असल्याने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आणखी लांबणार असल्याचे दिसतंय.

Published on: Mar 02, 2023 04:45 PM
“…म्हणून एक उमेदवार उभा केला”, चिंचवड निकालावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी काय दिली प्रतिक्रिया
‘हे कळू द्या…’, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नेमकं काय दिलं आव्हान?