MLA Disqualified | शिवसेना आमदार अपात्र प्रकरणासंदर्भातील मोठी बातमी, ‘या’ दिवशी होणार सुनावणी
VIDEO | शिवसेना आमदार अपात्रात प्रकरणाची सुनावणी लवकरच होणार असून सुनावणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस बजावण्यास सुरूवात झाली असल्याची विधिमंडळाच्या सूत्रांची खात्रीलायक माहिती
मुंबई, ९ सप्टेंबर २०२३ | शिवसेना आमदार अपात्राता प्रकरणाची मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे. या सुनावणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस बजावण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेनेच्या ४० तर ठाकरे गटाच्या १४ आमदारांना शिवसेना आमदार अपात्राता प्रकरणासंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे, अशी खात्रीलायक माहिती विधिमंडळाच्या सूत्रांनी दिली आहे. पुढील आठवड्यात होणारी ही सुनावणी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होणार आहे. सुनवाणीवेळी शिवसेनेच्या ४० तर ठाकरे गटाच्या १४ आमदारांना विधिमंडळ अध्यक्षांकडून त्यांचे मत मांडण्याचा अधिकार देण्यात येणार आहे. यावेळी हे सर्व आमदार त्यांना काही पुरावे सादर करायचे असतील तर त्यांना ते सादर करता येणार आहे, असेही सांगितले जात आहे.
Published on: Sep 09, 2023 08:53 AM