आरे प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु

| Updated on: Aug 05, 2022 | 2:08 PM

आरे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे. आरे कारशेडचं बांधकाम थांबवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

आरे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे. आरे कारशेडचं बांधकाम थांबवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. पर्यावरणप्रेमींकडून सात याचिका यासंदर्भात दाखल करण्यात आल्या आहेत. या सात याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी सुरू आहे. न्यायमूर्ती उदय लळित, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती एस रविंद्र भट्ट यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी होत आहे. तर ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण हे याचिकाकर्त्यांची बाजू मांडणार आहेत.

Published on: Aug 05, 2022 02:08 PM
प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Vasant More : राजकारणाची चीड यायला लागलीय, प्रभाग रचनेवरून वसंत मोरेंची राज्य सरकारवर टीका