VIDEO : Karuna Sharma | करुणा शर्मांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली
करुणा शर्मा यांचा जामीन अर्जावरील सुनावणी अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाने पुढे ढकलली आहे. आता सोमवारी म्हणजे 20 सप्टेंबरला जामीनावर सुनावणी होणार आहे. यामुळे आता करुणा शर्मा यांना अजून दोन दिवस कोठडीत काढावे लागणार आहेत. करुणा शर्मा यांना 5 सप्टेंबरला अटक करण्यात आली होती.
करुणा शर्मा यांचा जामीन अर्जावरील सुनावणी अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाने पुढे ढकलली आहे. आता सोमवारी म्हणजे 20 सप्टेंबरला जामीनावर सुनावणी होणार आहे. यामुळे आता करुणा शर्मा यांना अजून दोन दिवस कोठडीत काढावे लागणार आहेत. करुणा शर्मा यांना 5 सप्टेंबरला अटक करण्यात आली होती. जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. मात्र, करुणा शर्मा यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर 14 सप्टेंबरला अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी ही सुनावणी 18 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली होती.