Shivsena vs Eknath Shinde : शिवसेनेच्या याचिकेवर आज सुनावणी? कशाची याचिका जाणून घ्या….

| Updated on: Jul 11, 2022 | 10:43 AM

SC on Shiv Sena vs Eknath Shinde : शिवसेनेचे वकील सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी आज सरन्यायाधीश (Chief Justice) एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठापुढे विनंती करणार असल्याची माहिती मिळतेय.

नवी दिल्ली :  सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) शिवसेनेकडून याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर 11 जुलै रोजी म्हणजेच आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.  एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. मात्र, तत्पूर्वी शिवसेनेकडून बंडखोर आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याचे प्रयत्न झाले. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) शिवसेनेकडून याचिका दाखल करण्यात आली. शिवसेनेचे वकील सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी आज सरन्यायाधीश (Chief Justice) एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठापुढे विनंती करणार असल्याची माहिती मिळतेय. घटनेतील 10 व्या परिशिष्टातील तरतुदीनुसार बंडखोरी केल्यानंतर शिंदे यांनी आपला गट कुठल्याही पक्षात विलीन केला नाही. त्यामुळे त्यांच्या पाठिंब्यावर आलेलं सरकार घटनाबाह्य ठरवण्यात यावं या प्रमुख मागणीसह काही मुद्द्यांना आव्हान देणारी याचिका शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. तर एकनाथ शिंदे गटाकडूनही अजय चौधरी यांची गटनेतेपदी करण्यात आलेल्या नियुक्तीला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. या याचिकांवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठानं 11 जुलैला सुनावणी ठेवली आहे.

 

 

Published on: Jul 11, 2022 10:36 AM
Monsoon update : नाशिकमध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस, धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
Sanjay Raut : औरंगाबादच्या संभाजीनगर करण्याच्या पवारांच्या भूमिकेवरही संजय राऊतांचं भाष्य, काय म्हणालेत राऊत? पाहा