राखी सावंतच्या अटकपूर्व जामिनावर आज फैसला, काय आहे प्रकरण?
‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळख असणारी अभिनेत्री राखी सावंत हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात होणार सुनावणी
‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळख असणारी अभिनेत्री राखी सावंत हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. मॉडेल र्लिन चोप्रा हिच्या तक्रारीनंतर राखी सावंतविरोधात मुंबई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज याप्रकरणी सुनावणी होणार आहे.
राखी सावंतला गुरूवारी अटक करण्यात आली होती. अंबोली पोलिसांनी ही कारवाई केली असून एका मॉडेलचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल केल्याच्या आरोपाखाली राखीला अटक करण्यात आली होती. राखी सावंतने माझ्यावर अनेक खोटे आरोप केले, माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला, माझे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले, असे म्हणत राखी सावंतविरोधात मॉडेल शर्लिन चोप्राने मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, याप्रकरणात राखी सावंत हिने शर्लिन चोप्रावर केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे पोलीस तपासात उघड झाल्यानंतर पोलिसांनी राखीला अटक केली होती.