मुंबईकरांनो काळजी घ्या, उष्णतेचा पारा वाढला, किती आहे तापमान?

| Updated on: Apr 16, 2023 | 6:26 AM

VIDEO | मुंबईमध्ये दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढते, नागरिकांना आरोग्याबाबत सरकारने केले महत्त्वाचं आवाहन

मुंबई : मुंबईमध्ये दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढत आहे त्यातच काल 36 अंश सेल्सिअस इतके तापमान असून परवा हेच तापमान 43 अंश सेल्सिअस इतके होते. मुंबईकरांनी आता या उन्हापासून वाचण्यासाठी रुमाल, टॉवेल तसेच छत्र्यांचा उपयोग करण्याची सुरुवात केली आहे. डॉक्टरांनी देखील या स्वतःचे उन्हापासून बचाव करण्याचे आवाहन केले आहे. या उन्हामुळे उष्माघाताचे बळी देखील होऊ शकतात, त्यामुळे मुंबईकरांनी आणि मुंबईथ असणाऱ्या नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचे आवाहन सरकारकडून देखील करण्यात आलं आहे.

Published on: Apr 16, 2023 06:24 AM
“संजय राऊत आणि अनिल देशमुख यांनी एकमेकांना जेलमधील अनुभव सांगितले असतील!”
हे काश्मीर नाही तर पुणं आहे, पुण्यातील ‘या’ भागात झाला गारांचा पाऊस, बघा व्हिडीओ