शेतकऱ्याच्या बांधावरून थेट संतोष बांगर यांचा मुख्यमंत्र्यांना फोन अन्…
VIDEO | हिंगोलीत अवकाळी पावसाने बळीराजाचं मोठं नुकसान; आमदार संतोष बांगर यांचा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन, काय झालं बोलणं?
हिंगोली : राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानं शेतकरी हवालदिल झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. अशातच हिंगोलीमध्ये अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबात शिवेसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हिंगोलीतील शेतकऱ्यांच्या बांधावरून फोन केला आहे. संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे यांना थेट फोन करून शेतकऱ्यांचा संवाद मुख्यमंत्र्यांशी घडवून आणला. यावेळी शेतकऱ्यांशी फोनवरून संभाषण करत असताना शेतकऱ्यांना अश्वस्त करत सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचा शब्द शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. दरम्यान, या फोननंतर हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसाना संदर्भाची दखल घेत त्वरीत पंचनामे करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यावेळी त्यांनी झालेल्या नुकसानाची आपुलकीने दखल घेत चौकशीही केल्याचे पाहायला मिळाले.