चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्…
Chandrapur Rain update : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे उमा नदीच्या पुराने काठावरील शेतीचे मोठे नुकसान केले आहे. पात्र सोडून नदीला आलेल्या पुराचे पाणी शेतात शिरले आहे. मूल शहराच्या वेशीपर्यंत हे पाणी पोहोचले आहे. रविवारी दुपार या पुराची स्थिती दाखवणारी बघा ड्रोननं टिपलेली दृश्ये
चंद्रपूर जिल्ह्याला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. मात्र सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी पूरस्थिती कायम आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे उमा नदीच्या पुराने काठावरील शेतीचे मोठे नुकसान केले आहे. पात्र सोडून नदीला आलेल्या पुराचे पाणी शेतात शिरले आहे. मूल शहराच्या वेशीपर्यंत हे पाणी पोहोचले आहे. रविवारी दुपार या पुराची स्थिती दाखवणारी दृश्ये तेजस चौखुंडे युवकाने ड्रोनद्वारे टिपली आहेत. दरम्यान, अंधारी नदीची पाणीपातळी कमी झाल्याने चीचपल्ली जवळील पुलावरील पाणी ओसरल्याने चंद्रपूर-मूल महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तर वर्धा नदीच्या पाणी पातळीत घसरण झाल्याने चंद्रपूर-भोयेगाव-गडचांदूर मार्ग देखील वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
Published on: Jul 22, 2024 01:47 PM