Hingoli | हिंगोली जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशी जोरदार पावसाला सुरुवात
बीड, हिंगोलीसह सोलापूर अकोल्या गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. हिंगोली जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सोयाबीन काढणीच्या वेळी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांवर संकट ओढावलं आहे. अकोला जिल्हातल्या अंधारसावंगी व पांढुरणा भागात जोरदार पाऊस मध्यरात्रीच्या वेळी झाला.
बीड, हिंगोलीसह सोलापूर अकोल्या गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. हिंगोली जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सोयाबीन काढणीच्या वेळी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांवर संकट ओढावलं आहे. अकोला जिल्हातल्या अंधारसावंगी व पांढुरणा भागात जोरदार पाऊस मध्यरात्रीच्या वेळी झाला. चोंढी धरणाच्या पातळीत मोठया प्रमाणात वाढ होत असून आजूबाजूच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यामध्ये सलग दोन दिवस पाऊस सुरु असल्याने बोरी आणि हरणा नदीला पूर आला आहे. या पावसामुळे बोरी उमरगे पुलावर पाणी आल्याने अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी, गाणगापूर या महामार्गावरील गावांचा काल दिवसभर संपर्क तुटला होता.