Rain Update | पावसाचा उपनगरीय रेल्वे सेवेला फटका, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या ट्रॅकवर अनेकदा पाणी साचण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे रेल्वे सेवा ठप्प होताना दिसली होती. यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत.
पावसाचा उपनगरीय रेल्वे सेवेला फटका, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत. मुंबईत आज पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता. गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या ट्रॅकवर अनेकदा पाणी साचण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे रेल्वे सेवा ठप्प होताना दिसली होती. यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. आज सकाळपासून मुंबईत पावसाचा जोर कमी असला तरी हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.