दमदार पावसामुळे पवना नदीचं रौद्र रूप, पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली पण…

| Updated on: Jul 24, 2024 | 5:06 PM

पुण्यातील मावळ, लोणावळा आणि पिंपरी चिंचवड या भागात मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. गेली दोन दिवस सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पिंपरी चिंचवड मधून जाणाऱ्या पवना नदीच विहंगम रूप पाहायला मिळत आहे. पवना नदीचे पात्र दुथडी भरून वाहतंय, बघा याच पवना नदीपात्रातील धडकी भरवणारं दृश्य

Follow us on

राज्यभरात मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी भरलं असून नद्या, धरणं तुडूंब भरली आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांना महापुराचा धोका असल्याची परिस्थिती उद्भवली आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाची बॅटिंग पाहायला मिळत आहे. पुण्यातील मावळ, लोणावळा आणि पिंपरी चिंचवड या भागात मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. गेली दोन दिवस सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पिंपरी चिंचवड मधून जाणाऱ्या पवना नदीच विहंगम रूप पाहायला मिळत आहे. पवना नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. तर धरण क्षेत्रातही दमदार पाऊस पडल्याने पिंपरी-चिंचवडकरांचे पुढच्या सहा महिन्याची पाण्याची चिंता मिटलेली आहे. बघा याच पवना नदीपात्रातील धडकी भरवणारं दृश्य