Kokan Rain Update : ‘जगबुडी’नं ओलांडली धोक्याची पातळी, पाणी पुलावर अन् खेड-दापोली मार्ग बंद

| Updated on: Jul 14, 2024 | 1:22 PM

खेडमध्ये जगबुडी नदीने धोक्याच्या पातळी ओलांडली आहे. खेड मार्केट परिसरात जगबुडी नदीचे पाणी शिरल्याने नागरिकांची दाणादाण उडाली आहे. पावसाचा जोर वाढल्यास खेडमध्ये पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. खेड नगर परिषदकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्यात

गेल्या काही दिवसांपासून कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. तर खेडमध्ये जगबुडी नदीने धोक्याच्या पातळी ओलांडली आहे. खेड मार्केट परिसरात जगबुडी नदीचे पाणी शिरल्याने नागरिकांची दाणादाण उडाली आहे. पावसाचा जोर वाढल्यास खेडमध्ये पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. खेड नगर परिषदकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्यात. गेल्या दोन दिवसापासून मुसळधार बरसत असणाऱ्या पावसाने जगबुडी नदीने धोका पत्री ओलांडली. यामुळे जगबुडी नदीला मिळणाऱ्या नारंगी व इतर नद्यांनी देखील आपली पातळी ओलांडली आहे. यामुळे नदीतील पाणी दापोली खेड मार्गांवरील पुलावर आल्याने खेड दापोली मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने म्हणजे कुंभारवाडा डेंटल कॉलेज या मार्गे वळवण्यात आली आहे. संततधारपणे कोसळणाऱ्या पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास खेड शहरात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

Published on: Jul 14, 2024 01:22 PM
कोल्हापुरातील विशालगडावर अज्ञातांकडून दगडफेक, नेमकं काय घडलं? स्थानिकांचा आरोप काय?
अनंत अंबानीचं लग्नात 54 कोटींचं घड्याळ तर शाहरुख-रणवीरसह मित्रांना ‘इतक्या’ कोटींची भेट