Sangli Rain | ड्रोनमधून पाहा कृष्णेच्या काठावर महापुराचा विध्वंस

| Updated on: Jul 25, 2021 | 8:33 AM

Sangli Rain | सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळी 53 फुटावर गेल्याने नदीचे पात्र विखुरले आहे. सांगलीला पुन्हा एकदा तिसऱ्या महापुराचा फटका बसला आहे. तर कृष्णा नदीच पात्र बाहेर पडले आहे. या नदी पात्राच रौद्ररुप आणि विहंगम दृश्य ड्रोनद्वारे टिपले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. सध्या सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी 53 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे.

सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळी 53 फुटावर गेल्याने नदीचे पात्र विखुरले आहे. सांगलीला पुन्हा एकदा तिसऱ्या महापुराचा फटका बसला आहे. तर कृष्णा नदीच पात्र बाहेर पडले आहे. या नदी पात्राच रौद्ररुप आणि विहंगम दृश्य ड्रोनद्वारे टिपले आहे.

सांगलीतल्या हरिपूर रोडवरील शेकडो घरांत पाणी शिरलं आहे. दोन दिवसांपासून जवळपास 6 हजार कुटुंबांना दुसरीकडे हलवण्यात आले आहे. सांगलीतल्या सर्व खाजगी शाळा महापालिकेने ताब्यात घेतल्या असून तिथे काही जणांची राहण्याची व्यवस्था केली आहे.