राज्यात मुसळधार पावसाचं थैमान, मात्र ‘या’ जिल्ह्यात पावसानं फिरवली पाठ; बळीराजा चिंतेत

| Updated on: Jul 31, 2023 | 9:26 AM

VIDEO | अर्धा पावसाळा संपत आला तरी 'या' जिल्ह्यात पाऊसच नाही, पाऊस नसल्याने शेती पिकांना फटका तर बीड जिल्ह्यात एकूण 136 प्रकल्प आहेत त्यापैकी 40 प्रकल्पात केवळ 15 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक

बीड, ३१ जुलै २०२३ | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या मुसळधार पावसानं काही जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र राज्यातील एका जिल्हात मेघराजानं पाठ फिरवल्याने बळीराजा चिंतेत आहे. राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत असतानाच बीडमध्ये मात्र पावसाने दडी मारली आहे. बीड जिल्ह्यात एकूण 136 प्रकल्प आहेत त्यापैकी 40 प्रकल्पात केवळ 15 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. तर उर्वरित प्रकल्पात 50 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अर्धा पावसाळा संपत आला असला तरी अद्याप मुसळधार पावसाचे आगमन बीड जिल्ह्यात झाले नसल्याने येणाऱ्या काळात मोठे जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. पाऊस नसल्याने याचा फटका शेती पिकांना देखील बसला आहे.

Published on: Jul 31, 2023 09:21 AM
चार दिवसाच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात दमदार पावसाची हजेरी…
संभाजी भिडे यांच्या वक्तव्यांच्या मालिकेला ‘नो ब्रेक’! कोणा-कोणाचा केला अपमान, कारवाई होणार?