VIDEO : Chiplun Rain | रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये पुराने हाहाकार, नद्यांना महापूर, बाजारपेठा पाण्याखाली
रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळुणात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरात पाणी शिरले असून 2005 ची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती नागरिकांना लागून राहिली आहे.
रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळुणात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरात पाणी शिरले असून 2005 ची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती नागरिकांना लागून राहिली आहे. चिपळूण शहरातील जुना बाजार पुल आणि नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गेलेअसून दिसेनासे झाले आहेत. रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने याशिवाय कुंभार्ली घाट माथ्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाणी शहरात आले आहे .वाशिष्टी शिवनदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी आणखी वाढत आहे .शहरातील जुना बाजार पूल ,बाजारपेठ, जुने बस स्टॅन्ड ,चिंचनाका मार्कंडी, बेंदर्कर आळी, मुरादपुर रोड, एसटी स्टँड ,भोगाळे ,परशुराम नगर परिसरात पाणी वाढत आहे.