वर्ध्यात पावसाचा कहर, 42 गावांचा संपर्क तुटला

| Updated on: Jul 18, 2022 | 2:00 PM

संपूर्ण वर्धा जिल्ह्याला रविवार रात्रीपासून पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

संपूर्ण वर्धा जिल्ह्याला रविवार रात्रीपासून पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतूक बंद झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील तब्बल 42 गावांचा संपर्क तुटलेला आहे. हिंगणघाट तालुक्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक घरं पाण्याखाली आली आहेत. शेतीचंही बरंच नुकसान झालं आहे. राज्यात आतापर्यंत अतिवृष्टीमुळे 104 नागरिकांनी जीव गमावला. तसंच यंदाच्या पावसाळ्यात विविध दुर्घटनांमुळे 189 प्राणी दगावले आहेत. ठिकठिकाणी 73 तात्पुरते निवारा केंद्र उभारण्यात आलं असून आतापर्यंत 11 हजार 836 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे.

Published on: Jul 18, 2022 02:00 PM
द्रौपदी मुर्मूंवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले..
नाशिक खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय