मुंबईत पावसाचे धुमशान, मांटुग्यात रस्ता पाण्याखाली; पालिका प्रशासन फेल

| Updated on: Jul 25, 2024 | 11:32 AM

कालपासून सुरू झालेल्या पावसाने मुंबई महापालिका प्रशासनाची पोलखोल केली आहे. मुंबईतील सखल भागात मोठ्याप्रमाणावर पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना पाण्यातूनच मार्गक्रमण करावं लागत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक चांगलेच वैतागले आहेत. ज्या ठिकाणी पाणी साचलं तिथे पालिकेने पंप लावले आहेत. पण त्याचाही फारसा उपयोग होताना दिसत नाहीये.

Follow us on

मुंबईत काल रात्रीपासून जोरदार पाऊस पडला आहे. आज सकाळीही मुंबईत पावसाने चांगलाच जोर धरला. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलं आहे. माटुंग्याच्या लेडी जहांगीर मार्गावर संपूर्ण फुटपाथ पाण्याखाली गेली आहे. महापालिकेने पाणी काढण्यासाठी पंप लावले आहेत. पण त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. संपूर्ण रस्ताच पाण्याखाली गेल्याने स्थानिकांना पाण्यातूनच मार्गक्रमण करावं लागत आहे. तर फुटपाथ शेजारील दुकानातही पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसामुळे मुंबईच्या अनेक भागात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सायन, कुर्ला आणि चुनाभट्टी परिसरात पावसाचे पाणी साचल्याने स्थानिक चांगलेच वैतागले आहेत.