Heavy Rain Superfast News | 7 PM | मुसळधार पावसाच्या सुपरफास्ट बातम्या

| Updated on: Jul 22, 2021 | 9:02 PM

राज्यभरात आज पावसाने थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय. चिपळूण शहरामध्ये सध्या पुन्हा पावसाला सुरुवात झालीय.

राज्यभरात आज पावसाने थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय. चिपळूण शहरामध्ये सध्या पुन्हा पावसाला सुरुवात झालीय. चिपळूण शहरातील पाणी अद्यापही ओसरलेलं नाही. चिपळूण शहरातील भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूणमध्ये अनेक लोक पुरात अडकेलेले आहेत. चिपळूण शहरात 202 मिमी पडलेला पाऊस, धरणातून सोडण्यात आलेले पाणी भरतीची स्थिती त्यामुळे चिपळूणमध्ये 2005 पेभा भयानक स्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुराच्या स्थितीचा आढावा घेतला आहे. तर, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दोन हेलिकॉप्टर चिपळूणकडे रवाना झाली असून मदतकार्य करण्यात येणार आहे.

Mumbai Rain : ट्रॅक खालील जमीन गेली वाहून, khopoli ते Karjat लोकलसेवा पुर्णपणे बंद
Chiplun Rescue Operation | चिपळूणमध्ये बचावकार्य सरू, रेस्क्यू टीम एसटी डेपोकडे रवाना