वसईत पावसाचं थैमान! गोकुळ अंगण परिसर पाण्याखाली, जीव मुठीत घेऊन नागरिकांचं वास्तव्य

| Updated on: Jul 28, 2023 | 3:20 PM

VIDEO | वसईतील गोकुळ अंगण परिसरातील 9 इमारती पाण्याखाली, आजूबाजूचा परिसरही जलमय

वसई, 28 जुलै 2023 | वसई, पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. गुरुवारी दुपारपासून रात्रभर पडलेल्या पावसाने शहरातील मुख्य रस्त्यावर दोन फूट पाणी साचलेले आहे. तर वसई पश्चिम गोकुळ अंगण परिसर हा पूर्णपणे पाण्याखाली गेला, या परिसरातील 9 इमारती गुडघाभर पाण्याखाली आहे. त्यामुळे 200 कुटुंबाची मागच्या 15 दिवसापासून वाताहत सुरू आहे. इमारतीचा तळ मजल्यात पाणी शिरले असून, आजूबाजूचा सोसायटी परिसर हा जलमय झाला आहे. या सोसायटी मधील रहिवाशी हे वरच्या मजल्यावरील एकमेकांना आधार देऊन राहत आहेत. इमारतीमध्ये हळू हळू पाणी भरू लागल्याने अनेकांच्या घरात जेष्ठ नागरिक महिला आहेत, लहान मूल आहेत, ते सर्वजण आपला जीव मुठीत घेऊन या इमारतीत राहत आहेत.

Published on: Jul 28, 2023 03:20 PM
पावसाचा फटका, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आजही विशेष ब्लॉग!
धुव्वाधार! राज्यात ‘या’ जिल्ह्यांना ३ तासांचा अलर्ट, विजांच्या कडकडाटासह वादळ अन् मुसळधार पाऊस