Heavy Rain | मध्य महाराष्ट्रासह कोकणात पुढील पाच दिवस पावसाचा इशारा
मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि घाट परिसरात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. येथील बहुतांशी जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या तीन चार दिवसांपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पावसाने झोडपून काढलं आहे. आता पुढील पाच दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि घाट परिसरात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. येथील बहुतांशी जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. विशेषत: कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.