घाटकोपरमध्ये जोरदार पावसामुळे घरावर दरड कोसळल्याची घटना
मुंबईसह ठाणे जिल्ह्यात सोमवार संध्याकाळपासून कोसळलेल्या जोरदार पावसाने शहरवासियांची त्रेधा उडवली. शहरातील अनेक भागांत पाणी साचलं. तर लोकल गाड्यांचा वेग मंदावून वेळापत्रक विस्कळीत झालं
मुंबईसह ठाणे जिल्ह्यात सोमवार संध्याकाळपासून कोसळलेल्या जोरदार पावसाने शहरवासियांची त्रेधा उडवली. शहरातील अनेक भागांत पाणी साचलं. तर लोकल गाड्यांचा वेग मंदावून वेळापत्रक विस्कळीत झालं. मुंबई आणि ठाण्यातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. मुंबईत पाच ठिकाणी घरांची पडझड झाली. तर जोरदार पावसामुळे घाटकोपरमध्ये घरावर दरड कोसळल्याची घटना घडली. पंचशील नगरमध्ये ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घराचं मोठं नुकसान झालं. अग्निशमन दलाने घरातील सदस्यांना सुखरुप बाहेर काढलं.
Published on: Jul 05, 2022 01:21 PM