VIDEO : Kolhapur मधील कुरुंदवाड शिरढोण दरम्यानच्या पुलावर पाणी येण्याची शक्यता
कोल्हापूरमधील कुरुंदवाड शिरढोण दरम्यानच्या पुलावर पाणी येण्याची शक्यता आहे. यामुळे गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागालाही पावसाने झोडपून काढले.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झालीय .ती जवळपास 20 फुटांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. कोल्हापूरमधील कुरुंदवाड शिरढोण दरम्यानच्या पुलावर पाणी येण्याची शक्यता आहे. यामुळे गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागालाही पावसाने झोडपून काढले. शेत कामाला वेग आला असताना पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची जराशी तारांबळ उडाली. पण पावसाच्या आगमनाने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.