VIDEO : Beed | बीडमध्ये मुसळधार पावसाचं थैमान, मांजरा धरणाचे सर्वच 18 दरवाजे उघडले
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते, ते तीव्रता होऊन आता गुलाब चक्रीवादळामध्ये रुपांतरीत झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते, ते तीव्रता होऊन आता गुलाब चक्रीवादळामध्ये रुपांतरीत झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. बीडमधील माजलगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानं पुसरा नदीला पूर आला आहे. बीडमध्ये मुसळधार पावसामुळे मांजरा धरणाचे सर्वच 18 दरवाजे उघडले आहेत. सोलापूर, हिंगोली आणि अकोल्यात पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे. सोयाबीन काढणीच्या वेळी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांवर संकट ओढावलं आहे.