Kolhapur Rain | कोल्हापुरात धरणक्षेत्रात पावसाचा जोर, पंचगंगा नदीची पाणीपातळी 34 फुटांवर

| Updated on: Jun 18, 2021 | 2:18 PM

गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी तीन फुटांवर गेली असून नदीचे पाणी पात्राबाहेर गेलं आहे. जिल्ह्यातील 53 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले असून काही मार्गावरील वाहतूकदेखील पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी तीन फुटांवर गेली असून नदीचे पाणी पात्राबाहेर गेलं आहे. जिल्ह्यातील 53 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले असून काही मार्गावरील वाहतूकदेखील पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासात 17 फुटांनी वाढ झाल्याने, नदीतील मंदिरं आता पाण्याखाली गेली आहेत. शिवाय आजूबाजूच्या शेतातदेखील पाणी शिरायला सुरूवात झाली आहे. नदीची वाढती पाणी पातळी लक्षात घेता, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

PM Modi | देशात 1 लाख कोरोना योद्धा निर्माण करणार; मोदींच्या हस्ते प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ
Pune | शिवसेनेचा वर्धापन दिन साध्या पद्धतीने साजरा होणार, Anil Parab यांची माहिती