VIDEO : Mumbai Rain | ठाणे, नवी मुंबई, कल्याणमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

| Updated on: Jul 21, 2021 | 11:32 AM

मुंबई शहरासह उपनगरात जोरदार पाऊस गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोसळतोय. आजही ठाणे, नवी मुंबई, कल्याणमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यावर्षी सुरुवातीला पावसाने दांडी मारली होती.

मुंबई शहरासह उपनगरात जोरदार पाऊस गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोसळतोय. आजही ठाणे, नवी मुंबई, कल्याणमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यावर्षी सुरुवातीला पावसाने दांडी मारली होती. मात्र जुलैपासून पावसाने दमदार एन्ट्री केल्यामुळे गतवर्षीच्या जुलै महिन्यातील तुलनेत यावेळी दमदार पाऊस पडला.  मुंबईत पावसानं जोरदार पुनरागमन केलं आहे. मुंबईत मिठी नदी दुथडी भरुन वाहत आहे. समुद्राला आज भरती असल्यानं प्रशासन अ‌ॅलर्ट झालं आहे. मुंबईतील 24 वार्ड मध्ये प्रशासन दक्षझालं आहे. समुद्रात 4 मीटर उंचीच्या लाटा उसळतील असा अंदाज आहे. किंग्ज सर्कल परिसरातही पाणी असल्याचं समोर आलं आहे. काल उसंत घेतलेल्या पावसानं आज पुन्हा कमबॅक केलं आहे.

 

 

 

Vasai Crime | आई सतत दारुच्या नशेत असल्याने मुलानेच आईला संपवलं, वसई कोळीवाडा परिसरातील घटना
VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 21 July 2021