मुंबई-नाशिक महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच-लांब रांगा

| Updated on: Apr 22, 2023 | 9:20 AM

VIDEO | मुंबई-नाशिक महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी, मुलुंड टोल नाका ते तीन हात नाक्यापर्यंत ट्राफिक जाम, नागरिक हैराण

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ कायम सुरू असते. मात्र मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन धारकांना काल वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. दिवसाच्या सुरूवातीला सकाळीच दीड ते दोन तास नितीन कंपनी येथील पुलावर एक कंटेनर बंद पडल्याने मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तर आता सलग दुसऱ्या दिवशी मुंबई-नाशिक महामार्गावर मुलुंड टोल नाका ते तीन हात नाक्यापर्यंत ट्राफिक जाम झाल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाहीतर मुंबई-नाशिक महामार्गावर ही वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकही हैराण झाले होते. काल या महामार्गावर कंटेनर बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती तर आज रस्त्याची कामं सुरू असल्याची माहिती मिळत असून त्यांचा फटका प्रवाशांना बसत आहे. आठवड्याच्या अखेरस मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Special Report | खारघर दुर्घटनेवरून संजय राऊत यांचा नवा आरोप; म्हणताय, ‘…म्हणून शेड टाकलं नाही’
अक्षय्य तृतीयेनिमित्त दगडूशेठ बाप्पाच्या भोवताली अंब्यांचा दरवळ, बघा व्हिडीओ