केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अनियंत्रित झाल्याचा व्हिडिओ आला समोर

| Updated on: Jun 07, 2022 | 1:09 PM

केदारनाथ यात्रेत एक मोठा अपघात होता होता टळला. थम्बी एव्हिएशनचे एक हेलिकॉप्टर केदारनाथच्या हेलिपॉडवर लँड करत होते. त्यावेळी अचानकपणे हेलिकॉप्टर जमिनीवर आदळले, हेलिकॉप्टरने जोरात वळणही घेतले.

केदारनाथ यात्रेत एक मोठा अपघात होता होता टळला. थम्बी एव्हिएशनचे एक हेलिकॉप्टर केदारनाथच्या हेलिपॉडवर लँड करत होते. त्यावेळी अचानकपणे हेलिकॉप्टर जमिनीवर आदळले, हेलिकॉप्टरने जोरात वळणही घेतले. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने सांगितले की, ही घटना 31 मे रोजी घडली. हेलिकॉप्टर जेव्हा लँड करत होते, तेव्हा ते जमिनीवर आदळले. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. व्हिडिओत ते स्पष्टपणे दिसते आहे की जमिनीवर आदळल्यानंतर हेलिकॉप्टर 270 अंशांत घसरले. अत्यंत धोकादायक पद्धतीने हेलिकॉप्टरचे लँडिंग झाले. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, पायलटनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

सचिन अहिर यांना शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी
Chandrakant khaire : औरंगाबादचे नाव संभाजीनगर बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना – चंद्रकांत खैरे