नांदेडमध्ये आता हल्मेट सक्ती, विनाहेल्मेट चालकांवर दंडात्मक कारवाई
नांदेडकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नांदेडमध्ये हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. आता नांदेडकरांना विनाहेल्मेट दुचाकी चालवता येणार नाहीये. विनाहेल्मेट दुचाकी चालवताना चालक आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
नांदेडकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नांदेडमध्ये हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. आता नांदेडकरांना विनाहेल्मेट दुचाकी चालवता येणार नाहीये. विनाहेल्मेट दुचाकी चालवताना चालक आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. विनाहेल्मेट चालकाकडून पाचशे रुपये दंड तसेच तीन महिन्यांसाठी संबंधित व्यक्तीचा वाहन परवाना रद्द केला जाणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे.