Video | बीडमध्ये पेट्रोल भरण्यासाठी भाडे तत्वावर 10 रुपयात मिळतो हेल्मेट

| Updated on: Jan 21, 2022 | 10:22 AM

पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर हेल्मेट सक्तीचे करण्यात आलंय. मात्र बीडमध्ये याच शासन निर्णयास धाब्यावर बसवून, सर्रास पेट्रोल पंपाबाहेर दहा रुपये भाडेतत्त्वावर हेल्मेट दिले जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या वायरल होतोय.

बीड : पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर हेल्मेट सक्तीचे करण्यात आलंय. मात्र बीडमध्ये याच शासन निर्णयास धाब्यावर बसवून, सर्रास पेट्रोल पंपाबाहेर दहा रुपये भाडेतत्त्वावर हेल्मेट दिले जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या वायरल होतोय. हेल्मेट सक्तीचे आदेश बीडच्या सर्वच पेट्रोल पंपावर झळकत असले तरी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या आदेशाची पायमल्ली होताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना हेल्मेट विक्रेते तेच तेच वापरलेले हेल्मेट ग्राहकांना देत असल्यानं कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Video | लस न घेतलेल्यांना मुंबईत लोकलने प्रवास नाहीच, राज्य सरकारचा आदेश
VIDEO | Schools Reopen करण्याचा निर्णय चुकीचा, अविनाश भोंडवे यांची प्रतिक्रिया