Rohit Patil | रोहित पाटलांकडे राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं जाणार? जयंत पाटील म्हणाले की…

| Updated on: Jan 23, 2022 | 5:43 PM

कंवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या रोहित यांनी राष्ट्रवादीचा विजयी झेंडा फडकवून दाखवला होता.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यदपदी रोहित पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. कंवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या रोहित यांनी राष्ट्रवादीचा विजयी झेंडा फडकवून दाखवला होता. अत्यंत कमी वयात त्यांनी केलेल्या कामगिरीवरुन त्यांच्यावर आता नवी जबाबदारी पक्षश्रेष्ठींकडून दिली जाणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत होती. दरम्यान, जयंत पाटील यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. आर आर पाटील यांचे सुपुत्र असलेल्या रोहित पाटलांकडे आता राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेस्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाते का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. अनेक तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं सूचक वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे. सांगलीत पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी हे विधान केलंय.

वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा जंगी कार्यक्रम! 18 ठिकाणी भूमिपूजन आणि लोकार्पण
BMCसाठी भाजप आशिष शेलांरांकडे जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत? राजकीय घडामोडींना वेग!