मुंबईत पावसाचा जोर कमी, तरीही जुहू बीच रिकामा केला, काय कारण?

| Updated on: Jul 30, 2023 | 12:42 PM

VIDEO | मुंबईच्या 'जुहू' समुद्र किनाऱ्यावर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी, खबरदारी म्हणून बीच रिकामा, पण का?

मुंबई, ३० जुलै २०२३ | राज्यातील काही जिल्ह्यांसह मुंबईमध्ये पावसानं काही काळ का होईना उसंत घेतल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच मुंबईच्या समुद्राला मोठी भरती येणार असल्याचा अलर्ट देण्यात आला आहे. या अलर्टमुळे आज, रविवारी मुंबईचा जुहू बीच रिकामा करण्यात आला आहे. मुंबईच्या समुद्राला मोठी भरती येणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस आणि लाईफ गार्डचे जवान तैनात आहे. जीवरक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी हा अलर्ट मिळाल्यानंतर जुहू बीच वर असलेल्या पर्यटकांना किनाऱ्यावरून बाहेर येण्यास सांगितले आणि बीच पुर्णतः रिकामा केल्याचे पाहायला मिळाले. आज हायटाईड म्हणजेच मोठी भरती असल्याने कोणतीही घटना घडू नये, म्हणून जुहू बीचवरून लोकांना हटवण्यात आले आहे. त्यात आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने जुहू बीचवर दूरदूरवरून लोक आले होते. मात्र हायटाईडमुळे त्यांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्याची परवानगी नाकारली आहे. तर सध्या मुंबईच्या जुहू बीच पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.

Published on: Jul 30, 2023 12:42 PM
अजित पवार यांच्यानंतर शरद पवार भाजपसोबत येणार? चंद्रशेखर बावनकुळे यांचं सूचक विधान
“संभाजी भिडे अफजल खानाच्या वकिलाचा वंशज”, यशोमती ठाकूर यांचा हल्लाबोल