Highest temperature : राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या, धरणातील पाणीसाठा 9-10 टक्क्यांनी घटला
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्याने महिन्याभरात राज्यामधील धरणांतील उपयुक्त पाणीसाठय़ात सुमारे नऊ ते दहा टक्क्यांनी घट झाली आहे. राज्यातील पुणे नाशिक, औरंगाबाद, कोकण, अमरावती, नाशिक आदी सर्व विभागांत पाणीसाठय़ात झपाटय़ाने घट झाली आहे.
मुंबई : राज्यात उन्हाच्या झळा (Highest temperature) वाढल्याने महिन्याभरात राज्यामधील (State) धरणांतील उपयुक्त पाणीसाठय़ात सुमारे नऊ ते दहा टक्क्यांनी घट झाली आहे. राज्यातील पुणे (Pune), नाशिक, औरंगाबाद, कोकण, अमरावती, नाशिक आदी सर्व विभागांत पाणीसाठय़ात झपाटय़ाने घट झाली आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत पाणीसाठा अधिक पुणे विभागातील धरणात सर्वाधिक 68 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. यामुळे पुन्हा एकदा पाणी संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Published on: Apr 04, 2022 10:58 AM