Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातील जाणून घ्या, ‘या’ 10 मोठ्या घोषणा
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प होता आणि संपूर्ण देशाचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागून राहिले होते. आंध्र प्रदेश, बिहार या राज्याचा विकास आणि तरुणांना रोजगार देण्यासाठी अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. बघा त्यातील 10 मोठ्या घोषणा...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज लोकसभेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प होता आणि संपूर्ण देशाचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागून राहिले होते. आंध्र प्रदेश, बिहार या राज्याचा विकास आणि तरुणांना रोजगार देण्यासाठी अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. तर सीतारमण यांनी सर्वसामान्यांसाठीही मोठी घोषणा केली आहे. मोदी सरकारने 7 लाख 75 हजार रुपयांपर्यंतचे ज्यांचे उत्पन्न आहे ते करमुक्त केले आहे. याशिवाय कर्करोगाची तीन औषधे, सोन्या-चांदीचे दागिने आणि चामड्याच्या वस्तूही स्वस्त करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात महिला, आदिवासी, गरीब, शेतकरी आणि तरुणांवर या अर्थसंकल्पात अधिक भर देण्यात आला असून आजच्या अर्थसंकल्पातून पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. अनेक मोठ्या घोषणा यावेळी करण्यात आल्या आहेत. बघा त्यातील 10 मोठ्या घोषणा…